मधुर भांडारकर घेऊन येणार “फॅशन’चा सिक्‍वेल 

दिग्दर्शक मधुर भांडारकरने पुन्हा एकदा ग्लॅमरस जगतातील कटू सत्य मांडणाऱ्या चित्रपटाच्या निर्मितीचे स्वप्न उराशी बाळगले असून तो 2008 साली रिलीज झालेल्या ‘फॅशन’ चित्रपटाच्या सिक्वलचा विचार करीत आहे. नेहमीच सत्य कथेवर आधारित चित्रपट बनवण्याकडे भांडारकरांचा कल असतो.

“पेज 3′, “ट्रॅफिक सिग्नल’ आणि ‘चांदनी बार’ सारख्या चित्रपटाची निर्मिती केलेल्या मधुरने ‘फॅशन 2’ वर काम सुरू करीत असल्याचे सांगितले. मी समाजाचे वास्तव दाखवणाऱ्या गोष्टींवर चित्रपट बनवतो. त्यामुळे यावेळी माझा दृष्टीकोन तोच असेल. परंतु ही गोष्ट आता प्राथमिक पातळीवर असून कथेचा विस्तार लवकरच होईल, असे भांडारकरने सांगितले.

‘फॅशन 2’ च्या चित्रपटाची भांडारकरने सुरुवात केली आहे. सध्या एका स्क्रिप्टवर तो काम करीत असून त्यानंतर याची निर्मिती तो सुरू करेल. जेव्हा प्रियंका चोप्रा, कंगना राणावत आणि मुग्धा गोडसे यांचा अभिनय असलेला ‘फॅशन’ हा चित्रपट दशकापूर्वी रिलीज झाला तेव्हा प्रेक्षकांनी त्याला डोक्‍यावर घेतले होते. मॉडेलिंगच्या जगतात काम करणाऱ्या तरुणींना कोणकोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते ही गोष्ट मधुर भांडारकर यांनी सुंदररित्या दाखवली होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)