निवडक खरेदीमुळे निर्देशांकांत अल्प सुधारणा 

इंधन, वाहन आणि बॅंकिंग क्षेत्रातील शेअरची खरेदी 
मुंबई: शेअरबाजार निर्देशांकांची गेल्या दीड महिन्यात अतोनात हानी झाली आहे. ती कमी करण्यासाठी सरकार अनेक पातळ्यावर प्रयत्न करीत आहे. मात्र, तरीही बाजारात नकारात्मक वातावरण कायम आहे. आजही बाजारात खरेदी विक्रीच्या मोठ्या लाटा आल्या. मात्र निवडक खरेदी झाल्यामुळे बाजार बंद होतांना निर्देशांक शुक्रवारच्या तूलनेत काही प्रमाणात वाढले.
दिवसभर निर्देशांक कमी पातळीवर होते. मात्र, बाजार बंद होतांना देशातील संस्थागत गुंतवणूकदारांनी बरीच खरेदी केल्यामुळे निर्देशांकांत सुधारणा झाली. शेवटी बाजार बंद होताना सोमवारी मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 97 अंकांनी म्हणजे 0.28 टक्‍क्‍यांनी वाढून 34474 अंकावर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टी 31 अंकांनी वाढून 10348 अंकांवर बंद झाला. गेल्या तीन सत्रात सेन्सेक्‍स 2149 अंकांनी कोसळला होता.
मुख्य निर्देशांकात थोडी फार वाढ झाली असली तरी बाजारातील वातावरण एकूणच नकारात्मक असाहे. त्यामुळे मिड कॅप 1.90 टक्‍क्‍यांनी तर स्मॉल कॅप 1.94 टक्‍क्‍यानी कमी झाले.
आता आगामी आठवड्यापासून कंपन्यांचे ताळेबंद जाहीर होणे सुरू होणार आहे. पहिल्या तिमाहीत कंपन्यांनी चांगले ताळेबंद जाहीर केले होते. त्यामुळे त्या काळात निर्देशांकांत चांगली वाढ झाली होतर. जर आताही कंपन्यांचे ताळेबंद चांगले जाहीर झाले तर निर्देशांकांना आधार मिळण्याची शक्‍यता आहे.
भारतीय शेअरबाजारात थोडी फार खरेदी झाली असली तरी जागतीक शेअर बाजारात मात्र व्यापारयुद्धामुळे विक्रीचे वारे कायम आहेत. त्यामुळे आशियायी शेअरबाजार आणि युरोपियन शेअरबाजारातही आज निर्देशांक कमी झाल्याचे दिसून आले. खरेदीबरोबरच विक्रीचाही तेवढाच जोर असल्यामुळे धातू, रिऍल्टी, भांडवली वस्तू या क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाली. त्याचबरोबर आघाडीवर असलेल्या माहिती तंत्रज्ञान कंपन्यांचे शेअरही 3.18 टक्‍क्‍यांपर्यंत घसरले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)