सिनियर्सला दिलासा

– अमित शुक्‍ल

भाजपने 75 वर्षापेक्षा जास्त वयाच्या नेत्यांच्या निवडणूक लढण्यावर असणारे निर्बंध हटवले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सुरू असणाऱ्या भाजप संसदीय बोर्डाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. अर्थात पक्षाला या उमेदवारांच्या विजयाची खात्री असेल त्यांनाच निवडणुकीच्या रिंगणात उतरवले जाईल.

ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांनी निवडणूक लढवायची की नाही याचा निर्णय त्यांच्यावरच सोपवण्यात आला आहे. त्यापूर्वी कल्याणसिंह, लालजी टंडन, बाबूलाल गौर, आनंदीबेन पटेल आणि यशवंत सिन्हा यांच्या सारख्या ज्येष्ठ नेत्यांना 75 वर्षे पूर्ण झाल्यानंतर राजकारणातून बाजूला व्हावे लागले होते तर नजमा हेपतुल्ला आणि कलराज मिश्रा यांना मंत्रिमंडळाचा राजीनामा द्यावा लागला होता.

पक्ष कपिल देव, गौतम गंभीर, अक्षयकुमार, अनुपम खेर आणि नाना पाटेकर यांनाही निवडणूक लढवण्यास सांगू शकतो. विरोधी पक्षासमोर मोठ्या नेत्यांना उतरवण्याची योजना आहे. काही सेवानिवृत्त नोकरशहांनाही तिकीट दिले जाण्याची शक्‍यता आहे. राज्यसभेचे सदस्य, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, जयप्रकाश नड्डा आणि पियूष गोयल हे देखील लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्‍यता आहे.

भाजपमध्ये “अबाव्ह 75′
लालकृष्ण अडवाणी 91, मुरली मनोहर जोशी 85, शांताकुमार 84, बीसी खंडुरी 84, लीलाधर बघेला 84, करिया मुंडा 82, हुकुमदेव यादव 79, बिजोया चक्रवर्ती 79, नेपाल सिंह-78, बंशीलाल महतो 78, प्रभातसिंह चौहान 77, रामटहल चौधरी 77, कलराज मिश्र 77, भगतसिंह कोश्‍यारी 76, सुमित्रा महाजन 75

मोदी ऍप मधून उमेदवाराची निवड :
उमेदवारांच्या निवडीसाठी भाजपने संसद सदस्याचे वर्तन, जिंकण्याची गॅरेंटी, संघ आणि खासगी सर्वेक्षण याबरोबर मोदी ऍप सर्वेच्या निष्कर्षांला अधिक महत्त्व दिलेले दिसते. गेल्या सहा महिन्यांपासून पंतप्रधान स्वतःच संसद सदस्यांचा फीडबॅक घेत होते. त्याआधारे पॅनेल तयार केले. पंतप्रधानांनी संसद सदस्यांविषयी दिल्या गेलेल्या अहवालाचाही अभ्यास केला आहे. पंतप्रधानांनी सदस्यांकडून 2 पाने भरून माहिती मागितली आहे. त्यात उल्लेखनीय कामे, जाती समीकरणे, गेल्या वेळचे परिणाम, शहीद जवानांची संख्या आणि राज्य आणि केंद्र यांच्या योजनांची माहिती मागवली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)