ज्येष्ठ मार्क्‍सवादी नेते निरुपम सेन यांचे निधन

कोलकाता: ज्येष्ठ मार्क्‍सवादी नेते निरूपम सेन यांचे आज सकाळी दीर्घ आजाराने निधन झाले ते 72 वर्षांचे होते. पश्‍चिम बंगाल सरकार मध्ये ते अनेक वर्ष मंत्री म्हणून कार्यरत होते. मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिटब्युरोचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. पॉलिटब्युरो ही मार्क्‍सवादी पक्षाची सर्वोच्च अधिकारीक संस्था असते.

सेन हे गेले काही दिवस गंभीर आजारी होते. त्यांना कृत्रिम श्‍वसनावरच ठेवण्यात आले होते. त्यांच्या किडनी कार्यात मोठा बिघाड झाला होता त्यातून ते सावरू शकले नाहीत. त्यांच्यावर बुधवारी त्यांच्या मूळ गावी अत्यंसंस्कार केले जाणार आहेत. त्यांच्या निधनाने मार्क्‍सवादी चळवळीचा खंदा पुरस्कर्ता हरपला अशा शब्दात अनेकांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)