गंगा शुद्धीकरणासाठी १०२ दिवस आमरण उपोषणावर बसेलेल्या जी.डी. अग्रवालांचा मृत्यू

नवी दिल्ली: गंगा शुद्धीकरण चळवळीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून सक्रिय सहभाग नोंदवणारे जेष्ठ कार्यकर्ते जी.डी. अग्रवाल यांचे आज ऋषिकेश येथील एआयआयएमएस रुग्णालयामध्ये निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते.

अग्रवाल हे गंगा शुद्धीकरणाच्या मागणीसाठी सरकारविरोधात २२ जून पासून आमरण उपोषणावर बसले होते. १०२ दिवसांच्या उपोषणामध्ये ते केवळ पाणी व मध ग्रहण करत असत परंतु गेल्या दोन दिवसांपासून त्यांनी पाणी देखील सोडून दिले होते.

-Ads-

हॉस्पिटल प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार अग्रवाल यांना हृदय रोगाचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)