तिहेरी तलाक विधेयक प्रवर समितीकडे पाठवा

समस्त विरोधी पक्षांची राज्यसभेत मागणी

नवी दिल्ली: केंद्र सरकारने तिहेरी तलाकवर बंदी घालणारे विधेयक आज राज्यसभेत सादर केले. तथापि हे विधेयक प्रवर समितीकडे पाठवावे अशी मागणी राज्यसभेतील विरोधी पक्षांनीं केली आहे. कॉंग्रेस नेते गुलामनबी आझाद म्हणाले की सभागृहातील निम्म्यापेक्षा अधिक सदस्यांना या विधेयकाची आणखी छाननी व्हावी असे वाटत असून त्यामुळे हे विधेयक प्रवर समितीकडे पाठवण्याची सुचना त्यांनी केली. विरोधक या प्रश्‍नावर राजकारण करीत असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाने केला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कोणत्याही प्रस्तावाचे कायद्यात रूपांतर करण्याच्या आधी संबंधीत प्रस्ताव प्रवर समितीकडे पाठवण्याची प्रथा आहे ती प्रथा सरकार यावेळी मोडीत काढत आहे असा आरोप गुलामनबी आझाद यांनी केला. त्यावर संसदीय कामकाज मंत्री विजय गोयल म्हणाले की या प्रस्तावावर सभागृहातच चर्चा करण्याची सरकारची तयारी आहे पण विरोधक त्यात खोडसाळपणे अडथळा आणित आहेत. कॉंग्रेसने लोकसभेत या विधेयकाला पाठिंबा दिला आहे असे असताना ते येथे राजकारण का करीत आहेत असा सवाल गोयल यांनी उपस्थित केला.

या प्रकारामुळे ते केवळ मुस्लिम महिलांना न्याय मिळण्यात अडथळा आणित आहेत असा आरोप गोयल यांनी केला. दरम्यान या विषयावर सभागृहात चर्चा सुरू असताना अद्रमुक सदस्यांचा कावेरी विषयावरून सभागृहात आजही गदारोळ सुरूच राहिला. त्यामुळे सभागृहाचे कामकाज पहिल्यांदा पंधरा मिनीटांसाठी तहकुब करावे लागले. तिहेरी तलाकचे विधेयक लोकसभेत गेल्या गुरूवारी मंजुर झाले आहे. तथापी राज्यसभेत हे विधेयक मंजुर करून घेण्यासाठी सरकारला चांगलेच झगडावे लागणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)