तामिळनाडुत त्वरीत केंद्रीय पथक पाठवा 

कॉंग्रेसची केंद्राकडे मागणी

नवी दिल्ली – चक्रीवादळाने तामिळनाडुच्या विविध भागात मोठेच नुकसान झाले असून त्यासाठी या राज्याला केंद्रीय पातळीवरून तातडीने मदत पाठवण्याची गरज आहे. त्या राज्यात झालेल्या नुकसानीची त्वरीत पहाणी करण्यासाठी केंद्र सरकारने तिकडे पहाणी पथक पाठवावे अशी मागणी कॉंग्रेस तर्फे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांच्याकडे केली आहे.

चिंदबरम म्हणाले की अशा प्रकारच्या आपत्तीत नुकसानीचा अंदाज घेऊन राज्य सरकारकडून केंद्राकडे अहवाल पाठवला जातो आणि त्यानंतर त्यांच्याकडे मदतीची मागणी केली जाते. तथापी सध्या राज्य सरकार मदत आणि पुनर्वसन कामात व्यस्त आहे त्यामुळे गृह विभागाने दोन अधिकाऱ्यांचे पथक तिकडे पाठवून नुकसानीचा अंदाज घ्यावा अशी मागणी आपण राजनाथसिंह यांच्याकडे केली आहे. तामिळनाडुच्या सहा जिल्ह्यातील सुमारे एक लाख लोकांना या वादळाचा तडाखा बसला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)