जालन्यातून दानवेंन विरोधात लोकसभेची निवडणूक ‘मी’च लढवणार : अर्जुन खोतकरांचा हुंकार 

मुंबई : शिवसेना आणि भाजप मधील कलगीतुरा काही केल्या कमी होण्याची चिन्हे दिसत नसून दररोज शिवसेना आणि भाजपमधील नेते स्वबळाची भाषा करताना दिसत आहेत. दरम्यान आज या यादीमध्ये अर्जुन खोतकर यांची भर पडली असून महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याविरोधामध्ये जालन्यातून लोकसभेची निवडणूक आपणच लढवणार असल्याचे म्हंटले आहे.

भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांच्या जेष्ठ नेत्यांकडून युतीबाबत अद्याप ‘तळ्यात-मळ्यात’ भूमिका घेतली जात असली तरी अर्जुन खोतकरांनी मात्र थेट महाराष्ट्र भाजप अध्यक्ष्यांच्या विरोधामध्येच हुंकार भरला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

याबाबत बोलताना खोतकर म्हणाले की, “भाजप सरकार हे मगरूर आहे. काल जेव्हा जालन्यामध्ये भाजपचा राज्य स्तरीय मेळावा आयोजित करण्यात आला होता तेव्हा पोलीस त्याच जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याच्या कुटुंबियांना मारत होते. म्हणूनच जालन्याचे खासदार रावसाहेब दानवेंन विरोधात निवडणूक लढवणार आहे.”

यावर युती झाली तर काय कराल असा प्रश्न विचारला असता, “युती झाली तरी मी दानवेंन विरोधातच निवडणूक लढविणं कारण मला पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा पाठिंबा आहे.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)