पाण्याचे बॉक्‍स सांगून विदेशी मद्याची विक्री 

कारसह दोन लाखांचा माल जप्त 

कोल्हापूर – पाण्याचे बॉक्‍स आहे, असे सांगून कारमधून गोवा बनावटीच्या विदेशी मद्याची विक्री करणाऱ्या सावर्डे-पाटणकर (ता. राधानगरी) येथील दोघांना राज्य उत्पादन शुल्क विभागाने पकडले. ही कारवाई बिद्री-सोनाळी रस्त्यावर सापळा रचून केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या प्रकरणी अरुण परीट (वय 30) व प्रमोद कांबळे (22, रा. सावर्डे पाटणकर) या दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून दीड लाख रुपयांच्या गोवा बनावटीचे विदेशी मद्याचे 25 बॉक्‍स, कार असा सुमारे दोन लाख रुपयांचा मुद्देमाल पथकाने जप्त केला.

बिद्री (ता. कागल) या ठिकाणी बिद्री-सोनाळी रस्त्यावर सापळा रचला. त्यावेळी एक कार तेथून जात होती. पोलिसांनी तिचा पाठलाग करून तिला अडविले. कारची तपासणी केली असता त्यात कारचालक व आणखी एक असे दोघे मिळून आले. त्यांच्याकडे चौकशी केली असता कारमध्ये पाण्याचे बॉक्‍स असल्याचे दोघांनी सांगितले.कारची तपासणी केली असता त्यात गोवा बनावटीच्या विदेशी मद्याच्या विविध ब्रॅंडचे 750 मि.लि.चे 25 कागदी बॉक्‍स मिळून आले. या प्रकरणी अरुण परीट व प्रमोद कांबळे या दोघांना ताब्यात घेतले. या गुन्ह्यात अन्य कोणाचा सहभाग आहे का, याबाबत तपास सुरू असल्याचे कोल्हापूर जिल्हा अधीक्षक गणेश पाटील यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)