“बीएस-4” वाहनांची विक्री 1 एप्रिल 2020 नंतर थांबवा सर्वोच्च न्यायालयाचे आदेश 

नवी दिल्ली – “बीएस-4′ अर्थात भारत स्टेज -4 श्रेणीच्या सर्व वाहनांची विक्री देशभरात थांबवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. या निर्णयानुसार 1 एप्रिल 2020 पासून “बीएस-4′ श्रेणीच्या वाहनांची विक्री थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. “भारत स्टेज-4′ उत्सर्जनाच्या निकषांची अंमलबजावणी 1 एप्रिल 2020 पासून संपूर्ण देशभरात केली जाणार आहे. त्यानंतर केवळ “बीएस-6′ निकषाच्या वाहनांचीच विक्री केली जावी, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. न्या. मदन लोकूर यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांच्या पिठाने हा निर्णय दिला. स्वच्छ इंधनाच्या वापराचा वापर करणे ही काळाची गरज आहे, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

“भारत स्टेज’ हे सरकरने निश्‍चित केलेले उत्सर्जनाचे निकष आहेत. वाहनांकडून होणाऱ्या प्रदुषणाला रोखण्यासाठी वाहनांसाठी हे निकष निश्‍चित करण्यात आले आहेत. “बीएस-4′ निकषांची अंमलबजावणी देशभरात एप्रिल 2017 पासून करण्यात आली आहे. “बीएस-5′ गाळून 2020 पासून थेट “बीएस-6′ निकष स्वीकारले जातील असे केंद्र सरकारने 2016 साली जाहीर केले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

“बीएस-4′ निकषांच्या विक्रीसाठी वाहन उत्पादकांना मुदत वाढवून देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली गेली होती. “बीएस-6′ निकषांची पूर्तता न करणाऱ्या चारचाकी वाहनांची उत्पादकांनी विक्री करण्यासाठीची मुदत 30 जून 2020 पर्यंत वाढवण्याची सरकारची ईच्छा होती. “बीएस-4′ वरून “बीएस-6′ निकषांची मोठी उडी थोड्या कालावधीमध्ये गाठण्यासाठी वाहन विक्रीला मुदत वाढवून मिळावी अशी वाहन उद्योग कंपन्यांची मागणी होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने आणि ऍमिकस क्‍युरीनी या मागणीला विरोध केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)