भारत ‘अ’ संघात ऋतुराजची निवड

नवी दिल्ली – महाराष्ट्राचा उदयोन्मुख फलंदाज ऋतुराज गायकवाड याची भारत “अ’ क्रिकेट संघात निवड करण्यात आली आहे. हा संघ 11 जुलैपासून वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर जाणार आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ही माहिती दिली. पृथ्वी शॉ जखमी झाल्यामुळे ऋतुराज याला ही संधी मिळाली आहे. 22 वर्षीय ऋतुराज याने यंदाच्या मोसमात सातत्याने चमक दाखविली आहे.

त्याचप्रमाणे भारत “अ’ संघातील मयांक अग्रवाल व ऋषभ पंत यांची विश्‍वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघात वर्णी लागल्यामुळे त्यांच्या जागी अनुक्रमे अमोलप्रीतसिंग व ईशान किशन यांना भारत “अ’ संघात स्थान मिळाले आहे. या संघाचे नेतृत्व मनीष पांडे करीत असून या संघातऋतुराज गायकवाड, अमोलप्रीतसिंग, ईशान किशन (यष्टीरक्षक), शुभम गिल, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, राहुल चहार, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, क्रुणाल पांड्या, दीपक चहार, खलील अहमद, आवेश खान, नवदीप सैनी यांचा समावेश आहे.

भारत “अ’ संघ या दौऱ्यात एक दिवसाचे पाच अनधिकृत आंतरराष्ट्रीय सामने व तीन कसोटी सामने खेळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)