पक्षाच्या विचारांची माणसे निवडून द्या – रोहीत पवार

कर्जत: युतीचे सरकार शेतकरी विरोधी आहे. शेतीमालाला भाव नाही, दूध व्यवसाय अडचणीत आहे, बेरोजगारी मोठया प्रमाणात वाढली आहे. रस्त्याची दुर्दशा झाली आहे.सरसकट कर्जमाफीचे फक्त गाजर दाखवण्यात आले आहे. उजनी पाणी वाटपाचे नियोजन पूर्णपणे कोलमडले असून प्रत्येक वर्षी धरणग्रस्त शेतकऱ्यांना पाण्याची वाट पहावी लागत आहे. त्यामुळे अशा सरकारला पायउतार करा. पक्षाच्या विचारांची माणसे तुम्ही येणाऱ्या लोकसभा, विधानसभेमध्ये निवडून द्या तुमची राहिलेली विकासाची कामे पूर्ण करण्याची जबाबदारी माझी आहे असे प्रतिपादन युवा नेते रोहित पवार यांनी केले.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्जत तालुक्‍यातील भांबोरा येथे कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.
दुधोडी, बेर्डी, सिध्दटेक, वडारवस्ती तसेच कुळधरण जिल्हा परिषद गटामधील ताजू, बारडगाव , कुळधरण येथे कार्यकर्ता भेटीगाठी दौरा संपन्न झाला. दौऱ्याची सुरुवात सिद्धटेकचा सिद्धिविनायकाचे दर्शन घेऊन झाली. जलालपूर येथील अपघातग्रस्त ननवरे कुटुंबियांची भेट घेऊन वैष्णवी महादेव ननवरे हीच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी त्यांनी घेतली. बारडगाव सुद्रिक येथील डॉ. नलवडे यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. ताजू येथे बारामती ऍग्रोच्या वतीने मोफत टॅंकरद्वारे पाणी वाटप प्रारंभ करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी बारामती ऍग्रोचे गुळवे आबा, तालुकाध्यक्ष काकासाहेब तापकिर, युवक अध्यक्ष नितिन धांडे, सरपंच शाम कानगुडे, स्वप्नील तनपुरे, संचालक शहाजीराजे भोसले, डॉ.अरूण लोंढे, सागर लोंढे, अमोल लोंढे, संजय होलम, प्रमोद शेळके, राजेंद्र लोंढे, प्रवीण लोंढे, गणपत लोंढे , कैलास लोंढे , भीमराव लोंढे , सोमनाथ गोडसे, संतोष रणदिवे, अमोल मोरे, रुपेश लोंढे, वसंत लोंढे,उमेश जांभळे, बाळासाहेब कोराळे, रमेश पवार, अमोल भोसले, काशिनाथ जाधव, गणेश सुद्रिक, संजय सुद्रीक यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)