नगर – नवनागापूर ग्रामपंचायतीचा लाखो रुपयांचा कर थकविल्याप्रकरणी ग्रामपंचायतीच्या वतीने पुढील आठवड्यात 25 कंपन्यावर पोलीस बंदोबस्तात जप्तीची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामसेवक संजय मिसाळ यांनी दिली आहे.
एमआयडीसी मधील कंपन्यांकडे दीड कोटीची थकबाकी आहे. याशिवाय इतर उद्योग, हॉटेल, व लघुउद्योग व्यावसायिक यांच्याकडेही थकबाकी मोठ्या प्रमाणात आहे. त्यांना वेळोवेळी नोटिसा बजावूनही संबंधित कंपन्या याकड दुर्लक्ष करत आहेत. ग्रामपंचायतीच्या वतीने स्पीकर लावून थकबाकी भरण्याबाबत आवाहन करण्यात आले.