चेक चोरून महिलेचे सात लाख लांबवले

सुनेनेच केली सासूची फसवणूक
सातारा –
कोडोली ता. सातारा येथील एका महिलेचे चेक बुक चोरून बॅंक खात्यावरून सात लाख काढल्याप्रकरणी एकाच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. याप्रकरणी रंजना सुनील जाधव (रा.चंदननगर,कोडोली) यांनी नूतन सागर जाधव (रा. भोंगोली,ता.भोर,जि.पुणे) हिच्याविरोधात तक्रार दिली आहे.

याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांची सून असलेल्या नूतन हिने त्यांचे बॅंक ऑफ महाराष्ट्रचे चेक बुक चोरून त्यावर फिर्यादीच्या पतीच्या खोट्या सह्या केल्या. त्यानंतर त्या चेकबुकचा वापर करून बॅंक खात्यावरून सात लाख रुपये काढून त्यांची फसवणूक केली. याप्रकरणचा पुढील तपास महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपिका जौंजाळ करत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)