अजय देवगणच्या मुलाचा कारनामा पहाच!!!

बॉलीवूडमध्ये ‘स्टार किड’ यांची खूप चालती आहे. कपूर परिवार, बच्चन परिवार आणि खान परिवारामधील लहानगे हे नेहमीच त्यांच्या परिवारातील इतर स्टार मंडळी इतके ‘फेमस’ राहिले आहेत. सध्याच्या काळाचा विचार केला तर करीना कपूर आणि सैफ अली खान यांचा मुलगा तैमूर त्याच्या जन्मापासूनच प्रसिद्धीच्याझोतात राहिला. तर शाहरुख खान याचा मुलगा अबराम देखील इंडियन प्रीमियर लीग चालू असताना नेहमीच चर्चेचा विषय असतो, महेंद्र सिंग धोनीची मुलगी जीवा धोनी ही देखील खूप लोकप्रिय आहे.

अजय देवगण आणि काजोल यांचा मुलगा युग देवगण देखील नेहमीच चर्चेत असतो. कधी तो आपल्या वडिलांचा आणि आजोबांचा आदर्श घेऊन स्टंट करत असतो तर आधी आई काजोल आणि तिच्या माहेरच्या कुटुंबाचा आदर्श घेऊन उत्तम डांन्स करत असतो. पण यावेळी युग एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला.

-Ads-

अजय,काजोल, त्यांची मुलगी आणि मुलगा युग यांच्यासमवेत विमानतळाच्या बाहेर पडत होता. तेव्हा नेहमीप्रमाणे फोटोग्राफर्स यांनी गर्दी केली आणि फोटो घेत राहिले. चालताना सर्वांच्या पुढे असणाऱ्या युगने फोटोग्राफर्सकडे पाहत जीभ दाखवली आणि त्यामुळे थोडी हशा उडाली. या घटनेनंतर त्याला काजोल यांनी मागे घेतले आणि तो आईच्या मागेच चालू लागला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
4 :thumbsup: Thumbs up
5 :heart: Love
2 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
1 :blush: Great
1 :cry: Sad
1 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)