पिंगलानयेथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक; चार जवान शहीद

जम्मू –  काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यानंतर सोमवारी पहाटे सुरक्षा दल आणि दहशदवाद्यांच्या चकमकीमध्ये चार जवान शहीद झाले असून यात मेजर पदावरील अधिकाऱ्याचा समावेश आहे.


याबाबत सविस्तर वृत्त असे कि, सुरक्षा दलांना मिळालेल्या माहितीनुसार पुलवामा येथील पिंगलान येथे सोमवारी पहाटे शोध सुरु केला. या दरम्यान  दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला. या गोळीबारात पाच जवान जखमी झाले. चार जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सुरक्षा दलांनी दोन ते तीन दहशतवाद्यांना घेरले असून अजूनही चकमक सुरु आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)