दुसरा कसोटी सामना: रवींद्र जडेजा की कुलदीप यादव?

पहिल्या कसोटीतील फलंदाजांची निराशाजनक कामगिरी पाहिल्यानंतरही जादा फलंदाज खेळविण्याची शक्‍यता भारताचे गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरुण यांनी फेटाळून लावली. त्याऐवजी एक जादा फिरकी गोलंदाज संघात येण्याची शक्‍यता असल्याचे त्यांनी सांगितले. अशा परिस्थितीत उमेश यादवच्या जागी एक जादा फिरकी गोलंदाज संघात येणे अनिवार्य दिसते.

मात्र तो फिरकी गोलंदाज कोण असेल, हे भारत अरुण यांनी उघड केले नाही. चार वर्षींपूर्वीच्या इंग्लंड दौऱ्यातील लॉर्डस कसोटीत रवींद्र जडेजाला दोन्ही डावांत मिळून केवळ 3 विकेट घेता आल्या होत्या. मात्र त्याने दुसऱ्या डावांत 68 धावांची खेळी केली होती. मात्र त्याच वेळी कुलदीप यादवकडे दुर्लक्ष करणे सोपे नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्याच्या क्षमतेबद्दल भारतीय गोटात कौतुकाची भावना आहे आणि काल व आजच्या सराव सत्रात त्याने विराट कोहलीलाच गोलंदाजी केली, यावरून बरेच काही स्पष्ट होत आहे. कुलदीपने आपल्या फसव्या उंचीने व फिरकीने विराटलाही अनेकदा चकविले आणि विराटनेही त्याला दाद दिली. आता अंतिम 11 खेळाडूंमध्ये कोणाचा समावेश होणार हे अखेरपर्यंत रहस्यच राहणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)