दुसरा कसोटी क्रिकेट सामना; भारताची पुन्हा निराशाजनक सुरुवात 

लंडन: पावसाचा व्यत्यय कायम असताना अखेरीस दुसऱ्या दिवशी का होईना सुरू झालेल्या भारत व इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात नाणेफेक गमावून पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाची पावसाने पहिल्यांदा व्यत्यय आणल्यामुळे पंचांनी उपाहार लवकर घेतल्याचे जाहीर केले, तेव्हा 2 बाद 11 अशी निराशाजनक सुरुवात झाली होती. बर्मिंगहॅम येथे झालेला पहिला कसोटी सामना 31 धावांनी जिंकून इंग्लंडने पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

त्याआधी आदल्या रात्रीपासून पडत असलेल्या पावसाच्या सरींमुळे पहिल्या दिवशी एकाही चेंडूचा खेळ होऊ शकला नव्हता. त्यानंतर पावसाचे सावट असतानाही आज दुसऱ्या दिवशी ऐतिहासिक लॉर्डस मैदानावर शेकडो क्रिकेटशौकिनांनी गर्दी केली. ढगाळ हवामानात आणि थंडगार वारे वाहात असताना इंग्लंडने अपेक्षेप्रमाणेच नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीसाठी पाचारण केले. परंतु अँडरसनने प्रथम मुरली विजयला आणि मग लोकेश राहुलला बाद करीत भारताची 8.3 षटकांअखेर 3 बाद 15 अशी अवस्था केली. मुरली विजयला भोपळाही फोडता आला नाही, तर राहुलने 8 धावा केल्या. आणि पुजारा 1 रन काढून धावबाद झाला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्यानंतर आलेल्या पावसामुळे पंचांनी खेळ थांबविला. काही वेळाने पाऊस कमी झाल्याचे पाहून पंचांनी स्थानिक वेळेनुसार 12.45 वाजता खेळ पुन्हा सुरू करण्याचा आणि 1.45 वाजता उपाहार घेण्याचा निर्णय जाहीर केला. परंतु 12.30 वाजता जोरदार पाऊस आल्यामुळे पंचांनी उपाहाराची वेळ एक तास अलीकडे घेतली.

पुजारा, कुलदीप यादव यांचा समावेश 

सातत्याने पाऊस सुरू असल्यामुळे काल नाणेफेकही झालेली नव्हती.आज सकाळी पावसाने मान पाहून खेळ सुरू होण्यापूर्वी नाणेफेक करण्यात आली. इंग्लंडने नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजी दिली. दरम्यान इंग्लंडने काल जाहीर केल्यानुसार 20 वर्षीय ऑलिव्हर पोपने आज कसोटीत पदार्पण केले. तर त्याच वेळी बेन स्टोक्‍सच्या जागी ख्रिस वोक्‍सचा संघात समावेश केला. भारताने अपेक्षेनुसार सलामीवीर शिखर धवनच्या जागी चेतेश्‍वर पुजाराचा, तसेच वेगवान गोलंदाज उमेश यादवच्या जागी चायनामन गोलंदाज कुलदीप यादवचा संघात समावेश केला. तसेच हा कसोटी सामना चार दिवसांचाच राहिला असल्यामुळे नियमात एक बदल करण्यात आला. फॉलो-ऑनसाठी आघाडीचे अंतर 200 वरून 150 धावांवर आणण्यात आल्याचे सामनाधिकाऱ्यांनी जाहीर केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)