दुसरा कसोटी क्रिकेट सामना: फलंदाजांच्या कामगिरीचे भारतावर दडपण

इंग्लंडविरुद्ध दुसरा कसोटी क्रिकेट सामना आजपासून रंगणार

लंडन, दि. 8 – मालिकेत पिछाडीवर पडलेल्या भारतीय संघासमोर आज (गुरुवार) सुरू होत असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात इंग्लंडला पराभूत करून बरोबरी साधण्याचे आव्हान आहे. परंतु ऐतिहासिक लॉर्डस मैदानावर रंगणाऱ्या या कसोटीत विजय मिळविण्याची अवघड कामगिरी करून दाखविण्यासाठी भारताची मदार फलंदाजांवरच असल्याचे स्पष्ट झाले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय गोलंदाजांनी प्रयत्नांची शर्थ करूनही फलंदाजांच्या अपयशामुळे भारताला पराभव पत्करावा लागला. विराट कोहलीने कर्णधाराला साजेशी खेळी केल्यावरही दुसऱ्या बाजूने त्याला कोणत्याही प्रमुख फलंदाजाची साथ मिळाली नाही. एखाद्या फलंदाजाने विराटला साथ दिली असती, तरी गोलंदाजांनी भारताच्या हातात आणून दिलेला विजय 31 धावांनी हुकला नसता. असे असूनही सामन्याच्य पूर्वसंध्येला भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूममधील वातावरण खेळीमेळीचे होते.

सामन्याला दोन दिवस बाकी असताना लॉर्डसकडे नजर टाकल्यास हिरवीगार खेळपट्टी डोळ्यात भरत होती. अर्थात पहिला चेंडू टाकला जाण्यापूर्वी येथील ग्राऊंड स्टाफ खेळपट्टीवरील हिरवळ थोडी तरी कापणार हे निश्‍चित आहे. परंतु तसे घडले नाही, तरी एकंदरीत कोरडी आणि हिरवळीचे आच्छादन असलेली खेळपट्टी सर्वसाधारणपणे फलंदाजांना आणि तिसऱ्या दिवसानंतर गोलंदाजांना साथ देणार हे निश्‍चित दिसते.

प्रतिस्पर्धी संघ –
भारताचा कसोटी संघ – विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, मुरली विजय, चेतेश्‍वर पुजारा, अजिंक्‍य रहाणे (उपकर्णधार), करुण नायर, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्‍विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, हार्दिक पांड्या, ईशांत शर्मा, महंमद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमराह व शार्दूल ठाकूर.
पहिल्या कसोटीसाठी इंग्लंड संघ- जो रूट (कर्णधार), मोईन अली, जेम्स अँडरसन, जॉनी बेअरस्टो (यष्टीरक्षक), स्टुअर्ट ब्रॉड, जोस बटलर, ऍलिस्टर कूक, सॅम करन, कीटन जेनिंग्ज, ऑलिव्हर पोप, जेमी पोर्टर, अदिल रशीद व ख्रिस वोक्‍स.
सामन्याची वेळ- दुपारी 3-30 पासून.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)