दुसरा कसोटी सामना: पावसामुळे खेळ थांबला; ६ ओव्हरमध्ये भारत ११ रन २ बाद

लॉर्ड्स: भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेतील दुसरा सामना लॉर्ड्स येथे होत आहे. या सामन्यात इंग्लंडच्या संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

पहिल्या दिवशीचा खेळ पावसामुळे होऊ शकला नाही. मात्र आज दुसऱ्या दिवशीही कसोटी सामना सुरु होताच पुन्हा एकदा पावसाने व्यत्यय आणला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

उपहारापर्यंत भारताची ६ व्या ओव्हरमध्ये ११ रन २ बाद अशी धावसंख्या आहे. विराट कोहली आणि पुजारा धावपट्टीवर असून पावसामुळे खेळ थांबलेला आहे.

भारतीय संघ या मालिकेत १-० असा पिछाडीवर आहे. या सामन्यासाठी भारतीय संघात दोन बदल करण्यात आले असून सलामीवीर शिखर धवनच्या ऐवजी चेतेश्वर पुजारा संघात परतला आहे तर ‘चायनामन’ गोलंदाज कुलदीप यादव याची देखील संघात वर्णी लागली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)