दुसरा कसोटी क्रिकेट सामना : इंग्लडची भारतावर २५० धावांची आघाडी

लंडन: इंग्लंडने तिसऱ्या दिवशी पहिल्या डावांत ६ बाद ३५७ अशी धावसंख्या उभारत भारतावर २५० धावांची आघाडी घेतली. बर्मिंगहॅम येथे झालेला पहिला कसोटी सामना ३१ धावांनी जिंकून इंग्लंडने पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

पावसामुळे या कसोटीतील पहिला संपूर्ण दिवस एकाही चेंडूचा खेळ होऊ शकला नव्हता. त्यानंतर काल दुसऱ्या दिवशी चहापानापर्यंत पावसाचा व्यत्यय कायम राहिला. तिसऱ्या सत्रात झालेल्या खेळात इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांनी भारताचा पहिला डाव ३५.२ षटकांत १०७ धावांत गुंडाळताना या कसोटीवरही वर्चस्व मिळविले होते. जेम्स अँडरसनने २० धावांत ५ बळी घेत ऐतिहासिक लॉर्डस मैदानावरील आपल्या बळींची संख्या ९९ वर नेली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आज सकाळी निर्धारित वेळेत खेळ सुरू झाल्यावर ऍलिस्टर कूक व कीटन जेनिंग्ज यांनी इंग्लंडला २८ धावांची सलामी दिली. परंतु महंमद शमीने जेनिंग्जला पायचित करून ही जोडी फोडली. जेनिंग्जने २२ चेंडूंत ११ धावा केल्या. पुढच्याच षटकांत ईशांत शर्माने ऍलिस्टर कूकला परतविले तेव्हा इंग्लंडच्या धावसंख्येत केवळ ४ धावांची भर पडली होती. कूकने २५ चेंडूंत ४ चौकारांसह २१ धावांची खेळी केली.

त्यानंतर कर्णधार जो रूट आणि पहिला कसोटी सामना खेळणारा ऑलिव्हर पोप या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी १३ षटकांत ४५ धावांची भागीदारी करीत इंग्लंडची घसरगुंडी काही वेळ तरी रोखली. अखेर हार्दिक पांड्याने पोपला पायचित करून ही भागीदारी संपुष्टात आणली. कसोटीत पदार्पण करणाऱ्या पोपने कसोटीतील पहिल्या खेळीत ३८ चेंडूंत ३ चौकारांसह २८ धावांची खेळी केली.

पोप परतल्यावर जो रूट आणि जॉनी बेअरस्टो या अनुभवी जोडीने इंग्लंडची आगेकूच कायम राखली. परंतु उपाहाराच्या ठोक्‍याला महंमद शमीने जो रूटला पायचित करून इंग्लंडला जबरदस्त हादरा दिला. उजव्या यष्टीच्या किंचित बाहेर पडलेला हा चेंडू झपकन आत आला आणि रूटचा अंदाज चुकवून त्याच्या पॅडवर आदळला. पंचांनी रूटला बाद देण्यासाठी अजिबात वेळ घेतला नाही. रूटने ५३ चेंडूंत २ चौकारांसह १९ धावा केल्या.

महंमद शमीने ७४ धावांत ३ बळी घेतले होते. हार्दिक पांड्याने ६६ धावांत २, तर ईशांत शर्माने ८८ धावांत 1 बळी घेत त्याला सुरेख साथ दिली. त्यानंतर खराब प्रकाशामुळे खेळ थांबला तेव्हा इंग्लडने भारतावर २५० धावांनी आघाडी घेतली होती. ८१ ओव्हरमध्ये इंग्लंडची धावसंख्या ३५७ धावा ६ बाद, अशी होती.

संक्षिप्त धावफलक-
भारत- पहिला डाव- ३५.२ षटकांत सर्वबाद १०७ (रविचंद्रन अश्‍विन २९, विराट कोहली २३, अजिंक्‍य रहाणे १९, हार्दिक पांड्या ११, महंमद शमी १०, जेम्स अँडरसन २०-५, ख्रिस वोक्‍स १९-२, सॅम करन २६-१, स्टुअर्ट ब्रॉड ३७-१)
इंग्लंड- पहिला डाव- ८१ षटकांत ६ बाद ३५७ महंमद शमी७४-३, हार्दिक पांड्या ६६-२, ईशांत शर्मा ८८-1


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)