दुसरा एकदिवसीय क्रिकेट सामना : ऍलेक्‍स हेल्स दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर

लंडन: सलामीवीर ऍलेक्‍स हेल्स दुखापतीमुळे वन डे मालिकेतून बाहेर पडल्याचे स्पष्ट झाल्यामुळे पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताकडून पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर यजमान इंग्लंडच्या अडचणीत आणखी भर पडली आहे.

पहिल्या सामन्याआधी सरावादरम्यान हेल्स दुखापतग्रस्त झाला होता. यानंतर पहिल्या सामन्यात त्याचा इंग्लंडच्या संघात समावेश करण्यात आला नव्हता. मात्र आता हेल्स मालिकेमधूनच बाहेर पडला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच वन-डे सामन्यांच्या मालिकेत ऍलेक्‍स हेल्सने आपल्या फलंदाजीची छाप पाडली होती.

यानंतर तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात हेल्सने नाबाद 58 धावांची खेळी केली होती. या सामन्यात इंग्लंडचा संघ विजयी ठरला होता. पहिला वन-डे सामना गमावल्यानंतर इंग्लंडचा कर्णधार इयान मॉर्गनने हेल्सच्या दुखापतीबद्दल माहिती दिली. भारत व इंग्लंड यांच्यातील दुसरा वन-डे सामना 14 जुलै रोजी लॉर्डस मैदानावर खेळवण्यात येणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)