स्कॉर्पियन किक झाली बोथट …? 

प्रो कबड्डीमधील स्टार खेळाडू जसवीर सिंग हा त्याच्या स्कॉर्पियन किकसाठी खूप लोकप्रिय आहे. अर्जुन पुरस्कार विजेता हा खेळाडू प्रो कबड्डीच्या मागील पाच मोसमात जयपूर पिंक पँथर संघाचा सर्वात महत्वाचा खेळाडू होता. परंतु या मोसमापासून तो तमिल थालयवाज संघासाठी करारबद्ध झाला आहे. प्रो कबड्डीच्या पहिल्या मोसमाचे विजेतेपद जयपूर पिंक पँथर संघाला मिळवीन देण्यात जसवीरचा खूप  मोठा वाटा होता.  परंतु, या मोसमात तो आपल्या लौकिकास साजेसा खेळ करू शकलेला नाही.

प्रो कबड्डीचा सहावा मोसम तमिल चा होम लेग होता. यामध्ये त्यांचा कर्णधार अजय ठाकूर सर्वोत्तम रेडर म्हणून समोर आला. परंतु, उद्घटनाच्या सामन्यात गतविजेत्या पटणा पायरेट्सला पराभूत केल्यावर अन्य चार सामन्यात या संघाला विजय मिळवता आला नाही.सलग चार सामन्यात त्यांना पराभूत व्हावे लागले आहे.  त्याचे एक मुख्य कारण म्हणाजे जसवीरचे रेडींगमधील अपयश.

-Ads-

जसवीरला या नवीन मोसमात लयच सापडली नाही. त्याची अनेक कारणे देता येतील. त्याचे वाढलेले वय, त्याच्या कैशल्यातील हरवलेली नावीन्यता, त्याची तंदुरुस्ती ही त्यातील महत्वाची कारणे.

# कैशल्यातील हरवलेली नावीन्यता
मागील पाच मोसमात जसवीरच्या खेळाचा अंदाज सर्वांना आलेला असल्याने त्याच्या चाली काय आहेत हे सर्वांना माहिती झाल्या आहेत. त्यामुळे तो कोणत्या जागेच्या खेळाडूला लक्ष्य करणार हे सर्वांना माहिती आहे. त्याचबरोबर संघ आणि खेळाडू त्याच्या कच्या – पक्या दुव्यांचा अभ्यास करून त्याच्या विरुद्ध एक रणनीती घेऊन उतरत आहेत. त्यामुळे त्याला गुण मिळवण्यासाठी खूप जास्त संघर्ष करावा लागत आहे.

#तंदुरुस्ती
प्रो कबड्डीच्या मागील मोसमापासून सामन्यांची संख्या खूप वाढली आहे. त्याचबरोबर प्रो कबड्डी स्पर्धा तब्बल तीन महिने खेळवली जात आहे. त्यात संघाचे मुख्य रेडर  प्रत्येक सामन्यात १५ रेडपेक्षा जास्त रेड करतात. त्यात ते १० पेक्षा जास्त गुण  घेऊन सुपर टेन पूर्ण करताना दिसतात. परंतु, जसवीर तसे करताना दिसत नाही. त्याचे मुख्य कारण त्याची तंदरुस्ती आहे. त्याच्या खेळण्याची शैली देखील त्याच्या विपरीत आहे. तो काही सेकंद जास्त ऊर्जा लावतो आणि आपली रेड पूर्ण करतो. त्यामुळे त्याची ऊर्जा जास्त खर्च होते.

#वाढते वय 
प्रो कबड्डीमध्ये त्यातील नियमांमुळे रोचकता वाढली आहे.  त्यात कमीतकमी १८ वर्षे पूर्ण झालेले खेळाडू पदार्पण करू शकतात. अश्यावेळी ३४ वर्षाचे रेडर गती आणि स्फुर्तीच्या बाबतीत त्यांच्यासमोर कमी दिसतात. प्रदीप नरवाल, मोनू गोयत, सिद्धार्थ देसाई रिशांक,  देवाडिगा, सचीन  हे रेडर नवीन कौसल्या आणि गती घेऊन आले आहेत. त्यामुळे ते यशस्वी होत आहेत.

जसवीरचे वय वाढल्याने त्याच्या खेळातील  ती गती स्फुरण कमी झाले आहे.  त्याने मागील ४ सामन्यात १३ गुण मिळवले आहेत. त्यातही शेवटच्या बेंगाल वॉरियर्स विरुद्ध त्याने ७ गुण मिळवले होते.अन्य तीन सामन्यात मिळून त्याने ६ गुण मिळवले होते.तर नितीन तोमर, अजय ठाकूर, पवन कुमार सेहरावात यांनी एका- एका सामन्यात २० गुण मिळवलेले आहेत. त्यावरून कामगिरीत अंतर दिसून येते.

प्रो कबड्डीच्या पहिल्या चार मोसमात जयपूरसाठी ज्या स्कॉर्पियन किकने खोऱ्याने गुण मिळवले होते तिची सध्या धार कमी झाली आहे असे वाटते आहे. परंतु, कबड्डीचे चाहते म्हणून तो बाकीच्या सामन्यात चांगली कामगिरी करून पुन्हा यशस्वी होईल अशी अपेक्षा करू.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)