#रक्षाबंधन : कॅंटोन्मेट शाळेतील चिमुकल्यांनी बांधल्या पोलीसमामांना राख्या

भिंगार – येथील कॅंप पोलीस ठाण्यात आज अनोखे रक्षाबंधन झाले. कॅंटोन्मेंट शाळेच्या विद्यार्थिंनीनी पोलीस ठाण्यात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राखी बांधून संरक्षण करण्याची गळ घातली. पोलीस दादांनी देखील याला प्रतिसाद देत रक्षणाची कबुली दिली. स्नेहबंधच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात आला.

चिमुकल्या विद्यार्थिनींनी राख्या बांधून औक्षण केले. खऱ्या अर्थाने बालवयातच सामाजिक बंधुभावाचे मूल्य प्रत्यक्षात समजून घेण्याचा अनोखा धडा रक्षाबंधनानिमित्ताने मुलींनी यावेळीे गिरवला. स्नेहबंध फांउडेशनचे अध्यक्ष उद्धव शिंदे आणि भिंगार कॅंपचे सहायक पोलीस निरीक्षक संदिप पाटील यांच्या संकल्पनेतून हा रक्षाबंधन कॅंप पोलीस ठाण्यात झाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नागरिकांच्या सुरक्षेसाठी सण समारंभातही कुटूंबापासून दूर राहणारे पोलीसदादा चिमुकल्यांच्या या बंधुभावाने गहिवरून गेले. उपनिरीक्षक संजय कवडे. मोहिनी कर्डक, मुख्याध्यापिका शामला गाठे, शिक्षक संजय शिंदे, स्नेहल लवांडे, विठ्ठल राहिंज आदि उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)