शालेय पासचे वितरण 17 जूनपासून 

संग्रहित फोटो

पिंपरी-चिंचवडच्या हद्दीत दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना सुविधा

पुणे – पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून शालेय विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या अनुदानित पीएमपी पासचे अर्ज वितरण 10 जूनपासून सुरू करण्यात आले आहे. या मुलांना 17 जूनपासून प्रत्यक्षात पास वाटप सुरू केले जाणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत 1 ली ते 10 वी, तर पुणे महापालिकेच्या हद्दीत 1 ली ते 12 वीच्या पास दिले जातात. त्यात पालिका शाळांमधील मुलांना मोफत, तर खासगी शाळांमधील मुलांकडून 25 टक्के अनुदान घेऊन हे पास दिले जातात. दोन्ही महापालिकांकडून शहरातील शालेय मुलांना पासची सवलत दिली जाते. त्यासाठीची रक्कम महापालिकांकडून दिली जाते. तीन वर्षांपासून खासगी शाळांमधील मुलांना पासची 25 टक्के रक्कम भरण्याचा ठराव करण्यात आला असून उर्वरीत रक्‍कम दोन्ही महापालिका अनुदान स्वरूपात जमा करतात. यंदाच्या वर्षीच्या अर्जाचे वाटप पीएमपीकडून सोमवारपासून सुरू करण्यात आले असून कागदपत्रांसह पूर्ण भरलेल्या अर्जांची स्वीकृती दोन्ही महापालिकांमधील सर्व आगारांमध्ये केली जाणार आहे. अर्जांचे वाटप सर्व पास केंद्र आणि पीओएस केंद्रावर केले जाणार आहे.

मुलांनी स्वतंत्र अर्ज करण्याऐवजी शाळांनी एकत्रित अर्ज सादर केल्यास अशा शाळांना एकत्रितपणे पास देण्याची सुविधाही पीएमपीकडून सर्व आगारात उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना पास केंद्रावर न पाठविता शाळांनी ही सुविधा द्यावी, असे आवाहन पीएमपीकडून करण्यात आले आहे. पासबाबत माहितीसाठी 020-24545454 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन पीएमपी प्रशासनाने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)