आता शालेय साहित्याची झडती

अनुदान जमा केल्यानंतर खरेदी केल्याची शहानिशा

महापालिका शिक्षण विभागाचा महत्त्वाचा निर्णय

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुणे – शालेय साहित्य अनुदान मुलांच्या खात्यात जमा केल्यानंतर आता पालकांनी ही खरेदी केली, की नाही? याची तपासणी केली जाणार आहे. पैसे जमा करून महिना झाला तरी अजूनही अनेक मुलाच्या पालकांकडून साहित्य खरेदी करण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

प्राथमिक विभागाच्या सुमारे 83 हजार 620 मुलाच्या बॅंक खात्यात शैक्षणिक साहित्याची डीबीटी अर्थात डायरेक्‍ट बेनिफिशरी ट्रान्सफर योजनेद्वारे ही रक्कम जमा करण्यात आली आहे. तर उर्वरित 4 हजार मुलांची खाती काढण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

याबाबत शिक्षण विभाग प्रमुख शिवाजी दौंडकर म्हणाले, जमा केल्या जाणाऱ्या अनुदानात गणवेशापासून सर्व शालेय साहित्याची रक्कम बाजार दरानुसार देण्यात आली आहे. ही रक्कम जूनपासून जमा करण्यात येत आहे. प्राथमिक विभागाकडे 92 हजार 144 मुले आहेत. यातील 83 हजार 620 मुलांची बॅंक खाती असून त्यात अनुदानाची रक्कम जमा करण्यात आली आहे. तर उर्वरित 8 हजार 542 मुलांची खाती काढण्याचे काम सुरू असून त्यातील 3 हजार 807 मुले शाळेत येत नाहीत. त्यामुळे बॅंक खाती काढण्यात आलेल्या नसलेल्या मुलाची संख्या 4 हजार 735 आहे. ही रक्कम मुलाच्या खात्यात जमा करण्यासाठी 31 जुलैची मुदत निश्‍चित केली होती. हे काम जवळपास 95 टक्के पूर्ण झाले आहे.

पाहिल्या दीड महिन्यात अनुदानाची रक्कम जमा केल्यानंतर आता साहित्य खरेदी केली की नाही याची तपासणी ऑगस्ट महिना केली जाणार आहे. पालकांनी साहित्य घेऊन त्याच्या पावत्या मुख्याध्यापकाकडे जमा करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, पालकांनी प्रतिसाद दिलेला नाही. तसेच साहित्याबाबत अजूनही पालक गोंधळलेले आहेत. त्याबद्दल शाळेकडे विचारणा केली जात आहे. त्यामुळे मुख्याध्यापकांना सूचना दिल्या असून साहित्य खरेदी तपासण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
– शिवाजी दौंडकर, शिक्षण विभाग प्रमुख, मनपा.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)