“त्या’ मुलांसाठी साहित्य खरेदी मुख्याध्यापक करणार

पुणे – महापालिका शाळांमधील ज्या मुलांकडे बॅंक खाती उघडण्यासाठी काहीच कागदपत्रे नाहीत, तसेच जी मुले संस्था आणि वसतिगृहात राहतात, त्यांच्यासाठीची शालेय साहित्य आणि गणवेश खरेदी मुख्याध्यापकांच्या मदतीने केली जाणार आहे. त्याचा प्रस्ताव तयार करणे सुरू असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.

महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणानुसार, अशा मुलांची संख्या जवळपास 450 ते 500 आहे. महापालिकेकडून यावर्षीपासून शालेय साहित्याची रक्कम थेट पालकांच्या खात्यात जमा केली जात आहे. त्यात बालवाडीपासून ते 12 वी पर्यंत शिकणाऱ्या 1 लाख मुलांचा समावेश आहे. हे काम सुमारे 95 टक्के पूर्ण झाले आहे. मात्र, मदरसा, रेनबो, घरटं प्रकल्प तसेच स्वधार या संस्थेसह आणखी काही संस्थांमध्ये राहणाऱ्या मुलांकडे बॅंक खाते नाही. तसेच खाते उघडण्यासाठी आवश्‍यक कागदपत्रेही नाहीत. त्यामुळे अजून या मुलांना अनुदानाचे पैसे देण्यात आलेले नाहीत. परिणामी, त्याच्याकडे शालेय साहित्यही नाही. त्यामुळे त्यांना साहित्य देण्यासाठी पालिकेकडून वेगवेगळ्या उपायांवर चाचपणी केली जात होती. त्यात अखेर मुख्याध्यापकांची मदत घेण्याच्या पर्यायावर एकमत झाले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तीन पर्यायांची चाचपणी
महापालिकेने अन्य दोन पर्यायांची चाचपणी केली होती. त्यात या साहित्याची खरेदी महापालिकेने करावी, असा पर्याय होता. मात्र, पुन्हा त्यासाठी निविदा राबविल्यास “डीबीटी’ योजना अडचणीत आली असती. या बरोबरच प्रशासनाने ही मुले ज्या संस्थेत राहतात, त्या संस्थेच्या खात्यात पैसे देण्याबाबतही चाचपणी केली होती. मात्र, संस्था साहित्य घेईल का, नाही याबाबत शंका उपस्थित करण्यात आल्या. त्यामुळे दुसरा पर्यायही मागे पडला, त्यामुळे पैसे मुख्याध्यापकांच्या खात्यात देऊन साहित्य खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)