आर्या देवढेचे राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत यश

पाथर्डी – जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेमध्ये पाथर्डी तालुका तायक्वांदो अकॅडमीच्या आर्या देवढे याने नेत्रदीपक कामगिरी करून, पुणे विभागास रौप्य पदकाची कमाई केली आहे. देवढेने मिळवलेल्या यशामुळे सर्वत्र कौतुक होत आहे.

औरंगाबाद येथे राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धा नुकतीच पार पडली. 14 वर्षाखालील मुलींच्या 22 ते 24 या वजनगटात आर्या देवढे हिने मुंबई, औरंगाबाद व नागपूर या विभागातील विद्यार्थिनींना धुळ चारत पुणे विभागास रौप्य पदक मिळवून दिले. या स्पर्धेचे उद्घाटन खा. चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी अशोक गिरी, शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रवीण बोरसे, अविनाश बारगजे, आंतरराष्ट्रीय पंच बाळाजी जोगदंड, फुलचंद मेश्राम हे उपस्थित होते.

आर्या देवढे हिचे पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अभय आव्हाड, नगरजिल्हा सचिव संतोष बारगजे, पाथर्डी तालुका तायक्वांदो अकॅडमीचे अध्यक्ष शंकर जेधे, उपाध्यक्ष गोरक्ष गालम, ज्ञानेश्वर गायके, रावसाहेब मोरकर, शशिकांत नवगीरे, ज्ञानेश्वर कचरे, सदस्या भारती असलकर यांनी अभिनंदन केले. वरील यशस्वी खेळाडूंस पाथर्डी तालुका तायक्वांदो अकॅडमीचे सचिव अंबादास साठे यांचे मार्गदर्शन लाभले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)