हिवरेबाजार प्राथमिक शाळेची ‘स्नेहालय’ला दिवाळी भेट

संग्रहित फोटो

नगर -वंचितांची दिवाळी सुखकर व्हावी या सामाजिक भावनेतुन शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांच्या प्रयत्नातून स्नेहालय या संस्थेस आदर्श गाव हिवरेबाजार प्राथमिक शाळेने रु 15,000 चे विविध साहित्य दिले . त्यामध्ये कपडे ‘ दिवाळी खाद्यपदार्थ तेल आंघोळीचे व कपडयांचे साबण ‘ टूथपेस्ट व टूथब्रश ‘ फेस पावडर ‘ वहया ‘ पेन ‘ तसेच इतर शालेय साहित्य जमा करून पोपटराव पवार व पालकांच्या उपस्थितीत स्नेहालयाचे प्रतिनिधी श्री विशाल अहिरे यांच्याकडे सूपूर्त करण्यात आले .

यावेळी शाळेतील शिक्षिका रुपाली पवार खरमाळे यांनी स्नेहालयास रु . 15हजारांचा धनादेश त्यांच्या कुटुंबियांच्या वतीने दिला . या प्रसंगी विशाल आहिरे यांनी स्वतः अनाथ असल्यामूळे सोसाव्या लागणाऱ्या व्यथा सांगून विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाबद्दल स्नेहालय परिवाराच्या वतीने आभार व्यक्त केले .

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तुमचे जुने कपडे आमच्यासाठी नवीन आहेत असे आम्ही समजतो.पोपटराव पवार यांनी सर्व विद्यार्थी व शिक्षक यांचे कौतूक केले . दरवर्षी अशा प्रकारे अनाथ मुलांबरोबर दिवाळीचा आनंद साजरा करुन शाश्‍वत आनंद मिळवण्याचे आवाहन केले . शैक्षणिक ज्ञानाबरोबरच सामाजीक बांधीलकी वाढीस लागण्यासाठी हा उपक्रम निश्‍चित सर्वांसाठी प्रेरणादायी आहे .

स्नेहालयाने दिपदानासारखा उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या संवेदनशीलतेला साद घातली व विद्यार्थ्यांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला या बद्दल विद्यार्थ्यांचे पवार तसेच सर्व पालकांनी विद्यार्थ्यांचे कौतूक व अभिनंदन केले . याप्रसंगी कार्यक्रमास मुख्याध्यापक तुकाराम थिटे , माजी केंद्रप्रमुख रो .ना.पादीर ,एस.टी. पादीर ,सहदेव पवार, शिवाजी वारुळे, अशोक टकले , शाळेतील सर्व शिक्षक विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)