वाकडी शाळेत सरदार पटेल जयंती साजरी

संग्रहित फोटो

गोपाळपूर – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाकडी (ता.नेवासा) येथे भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची 143 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक नामदेव शिरसाठ, अपंग समावेशीतचे साधनव्यक्ती ज्ञानेश्वर जाधव यांच्या हस्ते सरदार पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

उपक्रमशील शिक्षक गणेश लंघे यांनी यावेळी वल्लभभाई पटेलांच्या विशाल कार्याची सोप्या भाषेत विद्यार्थ्यांना ओळख करुन दिली. त्याचबरोबर विद्यार्थ्यांकडून सरदारांच्या विविध फोटोंमध्ये रंगभरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. रंगभरण स्पर्धेतील विजेत्यांना संध्या वानखडे व सारीका निमसे यांच्या हस्ते बक्षिस देण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)