विज्ञान मंच योजनेसाठी आत्मा मालिकच्या 19 विदयार्थ्यांची निवड

कोपरगाव – प्रादेशिक विदया प्राधिकरण, नागपूर व जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग आयोजित विज्ञान मंच प्रवेश पूर्व परिक्षेत आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलाच्या आत्मा मालिक माध्यमिक व उच्च माध्यमिक गुरूकुल, कोकमठाणच्या 19 विदयार्थ्यांची विज्ञान मंच योजनेसाठी निवड झाली आहे. ही योजना विज्ञान शिक्षणाची गुणवत्ता वाढविणारी व राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेची पूर्व तयारीस सहाय्यभूत अशी आहे.

या अंतर्गत निवड झालेल्या जिल्हयातील प्रज्ञावंत विदयार्थ्यांसाठी प्रादेशिक विदया प्राधिकरण, नागपूर यांच्या वतीने “राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा’ मार्गदर्शन शिबीर घेतले जाते. यामध्ये सुजित लावरे, आर्केश कटारे, चेतन बाजड, शुुभम पवार, ओम भवर, षिकेश चितळे, सतिष चव्हाण, मिथिलेशराजे भोसले, ओम काळे, प्रताप वाळके, अर्जून विर, सनी आढाव, किरणकुमार नेहरकर, तेजस आहेर, यश इंगोले, सुदर्शन कासूळे, प्रविण वावरे , कल्पेश घोडेकर, मयंक वाघ या विदयार्थ्यांचा समावेश आहे.

-Ads-

या विदयार्थ्यांना प्राचार्य निरंजन डांगे, विभाग प्रमुख सागर अहिरे, सचिन डांगे, पर्यवेक्षक अनिल सोनवणे,शिक्षक नयना शेटे, सोपान शेळके, अमोल कर्डिले यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्‌दल विदयार्थ्यांचे आश्रमाचे संत देवानंद महाराज, परमानंद महाराज, निजानंद महाराज अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी, सरचिटणीस हनुमंतराव भोंगळे, कोषाध्यक्ष विठ्‌ठलराव होन, विश्‍वस्त प्रकाश भट, वसंतराव आव्हाड, प्रभाकर जमधडे, बाळासाहेब गोर्डे, प्रकाश गिरमे , व्यवस्थापक हिरामन कोल्हे आदिंनी अभिनंदन केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)