शहजापूर शाळेत विविध स्पर्धांचे आयोजन

संग्रहित फोटो

शेवगाव – तालुक्‍यातील शहाजापूर (फलकेवाडी) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गोवर, रुबेला लसीकरण कार्यक्रमांतर्गत निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा व मेहंदी अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांना सरपंच बाळासाहेब मरकड यांच्या हस्ते बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी फटाकेमुक्त दिवाळी करण्याची शपथ घेतली.

मुख्याध्यापक बाळकृष्ण कंठाळी यांनी या गोवर, रुबेला आजाराची लक्षणे, कारणे व त्यावरील उपाय सांगितले. या आजारावरील लस दि.27 नोव्हेंबर ते 27 डिसेंबर या कालावधीमध्ये देणे आवश्‍यक असल्याचे सांगितले. यावेळी आरोग्य सेविका सुनीता बनसोडे, डॉ. विष्णू गोरे, पुरावती फलके, पद्मावती डोईफोडे, कावेरी खंडागळे यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी जनाबाई डोईफोडे, मनीषा काते, साखरबाई डोईफोडे, कुसुम डोईफोडे आदी ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)