जिजामाता पब्लिक स्कूलमध्ये क्रीडा सप्ताह

संग्रहित फोटो

भेंडे – भेंडे येथील श्री मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेच्या जिजामाता पब्लिक स्कूलमध्ये क्रीडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. या क्रीडा सप्ताहात कबड्डी, क्रिकेट, थाळीफेक, भालाफेक, लांब उडी, 100 मीटर धावणे, 200 मीटर धावणे, 400 मीटर रिले अशा प्रकारच्या स्पर्धा सीनियर व ज्युनिअर गटात खेळल्या गेलेल्या प्राथमिक विभागात 100 मीटर धावणे, फ्रॉग जम्प, लिंबू चमचा, सॅक रेस, थ्रो इन बॉल बकेट, बुक बॅलन्स अशा प्रकारच्या विविध स्पर्धा खेळविण्यात आल्या.

यावेळी प्राचार्य दिनकराव टेकणे, उपप्राचार्य दीपक राऊत, प्रा. भारत वाबळे, प्रा.संतोष सोनवणे, अर्थ विभागाचे अर्जुनराव गायकवाड उपस्थित होते. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी क्रीडा विभाग प्रमुख विजय मोरे, सुदीप खरात, बाळासाहेब आरोळे, सारिका माळवे, संदीप घोलप, प्रवीण मांडे, सोपान नरोटे, सचिन गावडे, महेश डुकरे यांनी विशेष परिश्रम घेतले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)