काश्‍मिरमध्ये शाळेत स्फोट; 12 विद्यार्थी जखमी

श्रीनगर – जम्मू-काश्‍मिरमधील पुलवामा जिल्ह्यातील एका खासगी शाळेत झालेल्या स्फोटात 12 विद्यार्थी जखमी झाले आहेत. ही घटना दक्षिण काश्‍मिर येथील नरबाल गावातील काकपोरा परिसरात दुपारच्या वेळेस घडली. या स्फोटात जखमी झालेले सर्व विद्यार्थी हे इयत्ता दहावीतील आहेत.

या शाळेचे नाव फलाही-ई-मिलात असे आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जमखी विद्यार्थ्यांना पुलवामाच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्‍टरांनी दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शाळेमध्ये नेमका कोणत्या कारणामुळे स्फोट झाला याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या स्फोटात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला असून शालेय शिक्षकांची आणि व्यवस्थापनाची पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे. तसेच परिसरात नाकाबंदी करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)