शिष्यवृत्ती ऑनलाईन अर्जास आजपासून सुरुवात

परदेशात उच्च शिक्षण घेण्याची खुल्या प्रवर्गाती विद्यार्थ्यांना संधी

पुणे – परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज करण्यास आजपासून सुरवात झाली असून, शेवटची मुदत दि. 30 ऑक्‍टोबरपर्यंत राहणार आहे. विद्यार्थ्यांनी वेळेत अर्ज करावेत, असे आवाहन उच्च शिक्षण सहसंचालक विजय नारखेडे यांनी केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

खुल्या प्रवर्गातील 20 विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय राज्य सरकारने नुकताच घेतला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर संबंधित अधिकाऱ्यांची मंत्रालयात बैठक घेण्यात आली. त्यानुसार या शिष्यवृत्तीसाठी उच्च शिक्षण विभागाकडून जनजागृती करण्याचे सूचित केले आहे. शिष्यवृत्तीसाठी खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे पालकांचे उत्पन्न 20 लाखांपेक्षा जास्त नसावे, अशी अट आहे.

यासंदर्भात डॉ. नारखेडे म्हणाले, उच्च शिक्षण विभागांतर्गत 8 विद्यार्थ्यांना विविध विद्याशाखेंतर्गत परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिले जाणार असून, उर्वरित 12 विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या शिक्षणासाठी आहेत. या शिष्यवृत्तीसाठी तंत्रनिकेतन संचालनालयाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करणे आवश्‍यक असून, त्याची अंतिम मुदत दि. 30 ऑक्‍टोबरपर्यंत आहे. अर्जासोबत आवश्‍यक कागदपत्रे अपलोड करावीत. या सर्व अर्जाची पडताळणी करून अंतिम गुणवत्ता यादी तयारी केली जाणार आहे. त्यानंतर पात्र विद्यार्थ्यांची नावे जाहीर केले जातील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)