पिंपरी-चिंचवड शहरातील पालिका रुग्णालयात औषधांचा तुटवडा

संग्रहित छायाचित्र....

रुग्णांची हेळसांड : नाहक सहन करावा लागतो आर्थिक भुर्दंड

पिंपरी – महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे येणाऱ्या सर्वसामान्य रुग्णांची गैरसोय होत आहे. रुग्णांना बाहेरून औषधांची खरेदी करावी लागत आहे. त्यामुळे त्यांच्या खिशाला कात्री बसत आहे. त्वरीत औषधे खरेदी करावीत, अशा सूचनाही आयुक्‍तांनी दिल्या आहेत. मात्र गैरसोय होत असल्यामुळे रुग्णांमधून संताप व्यक्‍त केला जात आहे.

महापालिकेकडून औषधांची पुरेशी खरेदी करण्यात आली नाही. महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. रुग्णालयांमध्ये पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व गोरगरीब रुग्ण उपचारासाठी दाखल होत आहेत. त्यांच्यावर स्वस्त दरात उपचार होत असल्यामुळे त्यांच्याही खिशाला कात्री बसत नाही. मात्र सध्या औषधांचा पुरवठा कमी झाला आहे. त्यामुळे रुग्णांना बाहेरुन अधिकच्या दरात औषधे घ्यावी लागत आहेत. काही जण खासगी रुग्णालयांचा आधार घेत आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून ही परिस्थिती असल्यामुळे रुग्ण व नातेवाईकांमधून तीव्र संताप व्यक्‍त होत आहे.

आयुक्‍तांनी आदेश देऊनही…

या बाबत आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांनी लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयामध्ये नुकतीच बैठक घेतली. तत्काळ औषधे खरेदी करून महापालिका रुग्णालयांना देण्याचे आदेश देण्यात आले. वैद्यकीय अधीक्षकांना तातडीचे औषधे खरेदी करण्यासाठी दोन लाख रुपये खर्च करण्याचे अधिकार देण्याचा ठराव यावेळी करण्यात आला. त्यामुळे रुग्णांसाठी औषधे कधी उपलब्ध होणार असा सवाल रुग्ण व त्यांचे नातेवाईक विचारत आहेत.

“वायसीएममध्ये माफक दरांत वैद्यकीय उपचार होत असल्याने माझ्या मित्राला याठिकाणी दाखल केले होते. मात्र, पदरमोड करुन सर्व औषधे बाहेरुनच विकत आणावी लागत असल्याने त्याचा भूर्दंड आमच्यासारख्या सर्वसामान्यांना बसत आहे. प्रशासनाने दर्जेदार वैद्यकीय सुविधेसाठी वेळेत औषध खरेदी करावी, एवढी अपेक्षा आहे.
-संजय गायकवाड, निगडी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)