सहा महिन्यांत एसबीआयला तब्बल 5,555 कोटींचा चुना

नवी दिल्ली: वर्षभरात मोठमोठे बॅंक घोटाळे उघडकीस आले. अनेक बॅंकांना घोटाळेबाजांनी फसवले आणि घोटाळेबाज देशातून फरारही झाले. यातून भारतीय बॅंक व्यवस्था सावरलेली नसतानाच देशाच्या सर्वात मोठ्या बॅंकेला गेल्या सहा महिन्यांत तब्बल 5,555.48 कोटींना फसविण्यात आल्याची धक्कादायक माहिती माहितीच्या अधिकारात चंद्रशेखर गौड या कार्यकर्त्याने मिळवली आहे.
मध्यप्रदेशचे माहिती अधिकार कार्यकर्ते गौड यांनी ही माहिती मिळविली आहे. त्यांनी घोटाळ्यामुळे बॅंकेला किती रुपयांचे नुकसान झाले याची माहिती मागितली होती. मात्र, बॅंकेने याबाबत अंदाज लावता येणार नसल्याचे सांगितले आहे. तर एसबीआयचे ग्राहकही या नुकसानाबाबत अंधारातच आहेत.
देशाची सर्वात मोठी बॅंक एसबीआयमध्ये हे घोटाळे झाले आहेत. एप्रिल ते जूनदरम्यान 669 प्रकरणांमध्ये 723.06 कोटींची अफरातफर झाली. तर जुलै ते सप्टेंबरमध्ये 660 प्रकरणे समोर आली आहेत. या घोटाळ्यांची रक्कम 4832.42 कोटी रुपये एवढी आहे. या तीन महिन्यांत 9 घोटाळे कमी झाले असले तरीही रक्कम मात्र 568.33 टक्क्‌यांनी वाढली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात फसविल्या गेल्या नंतर बॅंकिंग क्षेत्रातून कोणत्या प्रकारची पाऊले उचलली जातात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)