मुंबई: देशातील सर्वात मोठ्या स्टेट बॅंक ऑफ इंडियाने आज मुदत ठेवींवरील व्याजदरामध्ये 10 बेसिक पॉईंटची वाढ केली. या नवीन दरांप्रमाणे 1 कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेच्या ठेवींसाठी 5 ते 10 बेसिक पॉईंट ताबडतोब लागू होणार आहेत, असे बॅंकेने आपल्या वेबसाईटवर स्पष्ट केले आहे. एक बेसिक पॉईंट हा एक टक्क्याचा एक हजारावा भाग असतो.
निवडक ठेवींवरील दरामध्ये या महिन्याच्या सुरुवातीला एचडीएफसी बॅंकेने 0.5 टक्के आणि आयसीआयसीआय बॅंकेने 0.25 टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. त्यानंतर एसबीआयकडून निवडक ठेवींवरील दरात वाढ करण्यात आली. ऍक्सिस, पीएनबी, बॅंक ऑफ बडोदा, इंडसइंड बॅंक या अन्य बॅंकांनीही व्याजदरात वाढ केली आहे.
भारतीय रिझर्व्ह बॅंकेची पुढील आठवड्यात होणाऱ्या बैठकीआधीच एसबीआयने मुदत ठेवीवरील व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. आता एक वर्षाहून अधिक काळासाठी ठेवी ठेवल्यास त्या पैशांवर 6.8 टक्के व्याज मिळणार आहे. तर तीन वर्षांसाठी ठेवलेल्या रकमेवरही 6.80 टक्के दराने व्याज मिळणार आहे. पहिल्यांदा हा दर 6.75 टक्के एवढा होता.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा