SBI Bank : आता एटीएममधून काढता येणार फक्त ‘एवढी’ कॅश

File Photo

नवी दिल्ली – दिवाळी सण येण्यापूर्वी स्टेट बँक आॅफ इंडिया (एसबीआय)ने एटीएममधून कॅश काढण्यासंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. आता एसबीआय खातेधारांना एटीएममधून एका दिवशी केवळ 20 हजार रूपयेच काढता येणार आहेत. यापूर्वी खातेदारास एटीएममधून एका दिवसात 40 हजार रूपये काढण्याची मर्यादा होती.

स्टेट बँक आॅफ इंडियाचा हा नवीन नियम 31 आॅक्टोबर पासून लागू होणार आहे. हा नियम एसबीआयच्या क्लासिक डेबिट कार्ड आणि मेस्ट्रो डेबिट कार्ड्सवर सुध्दा लागू करण्यात येणार आहे.

-Ads-

एसबीआयने त्यांच्या संकेतस्थळावर म्हटलं आहे, क्लासिक आणि मेस्ट्रो डेबिट कार्डव्दारे प्रतिदिन कॅश काढण्याची मर्यादा 40 हजारावरून 20 हजार करण्यात आलेली आहे. हा नियम 31 आॅक्टोबर 2018 पासून लागू होईल. एसबीआयने म्हटलं आहे की, ज्या खातेदारांना रोज ज्यादा कॅश काढावी लागते, ते उच्च वेरिएंट कार्ड घेऊ शकतात.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)