‘भाजपाचा समाजामध्ये फूट पाडण्याचा डाव’ भाजपा खासदाराचा घरचा आहेर 

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाच्या उत्तर प्रदेश येथील खासदार सावित्री बाई फुले यांनी आज भाजपावर गंभीर आरोप लावत पक्षाला रामराम ठोकला आहे. “जनतेचा पैसा सरकार पुतळे बांधण्यावर उधळत असून जनतेसाठी मात्र कोणतीच कामे करण्यात येत नाहीयेत” अशी परखड टीका सावित्री यांनी केली.

फुले उत्तर प्ररदेशातील बाहरेच मतदार संघातून भाजपाच्या खासदार असून गेल्या काही दिवसांपासून त्या पक्षश्रेष्ठींवर नाराज होत्या. त्यांनी पक्षाबाबतची आपली नाराजी अनेक वेळा जाहीर बोलून दाखवली आहे. आज पक्षातून बाहेर पडण्याचा आपला निर्णय जाहीर करताना त्या म्हणाल्या की, “भाजपा समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे, मी एक दलित समाज सेविका आहे, भाजपा सरकार दलितांच्या हक्कांसाठी काहीच करत नाही.”

तत्पूर्वी मंगळवारी देखील फुले यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या ‘हनुमान’ वाक्व्यावरून रोष व्यक्त केला होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
4 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)