बचत, गुंतवणूक आणि संपत्ती व्यवस्थापन (भाग २)

बचत, गुंतवणूक आणि संपत्ती व्यवस्थापन (भाग१ )

आता गुंतवणुकीतून संपत्ती बनवणं ही काय सोपी गोष्ट नाहीय. तर त्यासाठी सर्वांत प्रथम हवा तो तुम्ही योग्य अभ्यासाद्वारे गुंतवणूक करीत असलेल्या साधनावरचा विश्वास, की याच अमूक एक साधनाद्वारे माझी गुंतवणूक ही पुढील काही वर्षांत ही अनेकपट वाढून त्याची संपत्ती बनणार आहे. अनेक लोक सोन्यावर विश्वास दाखवून त्या गुंतवणुकीलाच संपत्ती समजून बसतात. परंतु, वर म्हटल्याप्रमाणं गुंतवणुक ही मागील वर्षांत अनेक पटीत वाढलेली असेल तरच त्यास आपण वेल्थ म्हणू शकतो.याउलट, 24 कॅरेट सोन्याचा 1 तोळ्याचा भाव हा 2009 मध्ये 15500 रुपये होता तर त्याच वेळी, सर्वांच्या परिचयाचा असलेल्या एशियन पेंट्‌स या कंपनीच्या शेअर्सचा भाव होता 72 रुपये. आज सोन्याचा भाव आहे 31000 रुपये, म्हणजे साधारण 10 वर्षांत दुप्पट, तर त्याच शेअर्सचा आज भाव आहे 1400 रुपये, म्हणजे साडे एकोणीस पट. (यांत मिळालेला लाभांश गृहीत धरला नाहीय.)

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

एशियन पेंट्‌सच्या ऐवजी जर ती गुंतवणूक अजंठा फार्माच्या शेअर्समध्ये केली असती तर ती 300 पटींपेक्षा जास्त वाढली असती. आता ठरवा कोण आहे वेल्थ क्रिएटर. आता कांही लोकांचं म्हणणं असतं की असा उत्तम शेअर आम्हाला निवडता येत नाही तर मग अशांसाठी मागील कांही महिन्यांत याच सदरात ‘मल्टीबॅगर्सच्या शोधात’ हा लेख प्रसिद्ध झाला होता त्यात उत्तम शेअर्स निवडण्याबाबत काही क्‍लुप्त्या उल्लेखल्या होत्या. अगदी उत्तम शेअर्सची निवड जरी जमत नसेल तरी अगदी ढोबळ मानानं सेन्सेक्‍स या निर्देशांकात जरी गुंतवणूक केली असती (इंडेक्‍स फंडद्वारे) तरी त्यात कांही पट वाढ झाली असती. (बरोबर दहा वर्षांपूर्वी म्हणजे 2008 मध्ये सेन्सेक्‍स होता 7700 व आज आहे 38250, म्हणजे जवळजवळ 5 पट वाढ).

दुसरे एक उदाहरण म्हणजे अनेक लोक स्थावर मालमत्ता म्हणजेच खरी संपत्ती असं समीकरण जुळवतात. परंतु मागील 10 वर्षांत त्यातील गुंतवणूकदारांचं काय झालंय यावर न बोललेलंच बरं.
असो, गुंतवणुकीतून संपत्ती करताना दुसरी महत्त्वाची गोष्ट हवी, ती म्हणजे संयम. साधा दाखला द्यायचा तर नुकत्याच लावलेल्या झाडापासून लगोलग फळांची अपेक्षा ठेवणं मूर्खपणाचं आहे, तरी दुसरीकडं त्याची योग्यप्रकारे निगा राखणं हे देखील गरजेचं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)