मिताली सारखीच मलाही वागणूक मिळाली होती – सौरव गांगुली

कोलकाता: महिला टी-20 विश्‍वचषकाच्या उपान्त्यफेरीतील सामन्यात भारतीय संघाला मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले होते. या सामन्यात संघातील सर्वात अनुभवी फलंदाज मिताली राजला वगळण्यावरुन सुरु झालेला वाद अद्याप शमला नसून या वादात भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरभ गांगुलीने उडी घेतली असून मितालीला सध्या ज्या प्रमाणे वागणूक मिळाली आहे तशीच वागणूक मलाही मिळाली होती अशी खदखद त्याने यावेळी व्यक्त केली आहे.

मिताली राजने विश्‍वचषकातील पाकिस्तान आणि आयर्लंडविरूद्धच्या सामन्यांमध्ये अर्धशतक झळकावूनही तिला ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यात विश्रांती देण्यात आली होती. तर, त्यानंतरच्या इंग्लंडविरुद्धच्या उपान्त्य सामन्यातही तिला अंतिम 11 खेळाडूंमध्ये स्थान मिळाले नाही. त्यातच भारताने हा सामना 8 गड्यांनी एकतर्फी गमावला आण्इ संघाचे विश्‍वचषक विजयाचे स्वप्न भंगले होते.

-Ads-

यावेळेस बोलताना सौरव गांगुली म्हणाला की, भारताचे नेतृत्व केल्यानंतर मलाही डगआऊटमध्ये बसावे लागले होते. त्यातच जेव्हा मिताली राजलाही संघातून बाहेर करण्यात आले. तेव्हा मी तिचे या ग्रूपमध्ये स्वागत असल्याचे म्हटले होते. यावेळी बोलताना गांगुलीने सांगितले की,कर्णधार जर तुम्हाला बाहेर बसण्यास सांगतो. तेव्हा तसे करा. मी फैसलाबादमध्ये पाकिस्तान विरुद्ध झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या वेळी संघाच्या बाहेर बसलो होते. तितकेच काय त्यानंतर जवळपास मी 15 महिन्यांपर्यंत एकही एकदिवसीय सामना खेळलो नाही. विशेष म्हणजे तेव्हा मी कारकीर्दीतील सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करत होतो. आयुष्यात असे होत असते. कधी-कधी जगात तुम्हाला बाहेरचा रस्ताही दाखवण्यात येतो. तेंव्हा तुम्ही ते स्विकारायला हवे.

मात्र, मितालीसाठी रस्ते बंद झालेले नाहीत. तिच्या साठी आणखी संधी चालून येतील. मैदानावरील प्रतिक्रिया ऐकून मी निराश झालो नाही. परंतु, उपांत्य सामन्यात भारत पराभूत झाला. यामुळे मी निराश झालो आहे. कारण भारताचा संघ आणखी पुढे जाईल, असे मला वाटत होते. आयुष्यात कुठल्याच गोष्टीची खात्री नसते.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
1 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)