भारत-पाकिस्तानमधील तणाव दूर करण्याचा सौदीचा निर्धार 

इस्लामाबाद  – भारत आणि पाकिस्तानमधील तणाव दूर व्हावा यासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार सौदी अरेबियाने बोलून दाखवला आहे. सौदीचे राजपुत्र मोहम्मद बिन सलमान यांनी पाकिस्तानचा दौरा केला. त्यानंतर ते भारतात दाखल होत आहेत. त्यांच्या दौऱ्यांचा आधार घेत सौदीने भारत आणि पाकिस्तानमधील संबंध सुधारावेत यासाठी पुढाकार घेण्याचे ठरवले आहे.

जम्मू-काश्‍मीरमधील पुलवामात नुकताच पाकिस्तानस्थित जैश-ए-महंमद या दहशतवादी संघटनेने भयंकर हल्ला घडवला. त्यामुळे भारत आणि पाकिस्तानमधील आधीच ताणले गेलेले संबंध आणखी बिघडले आहेत. संतप्त बनलेल्या भारताने पाकिस्तानच्या आर्थिक नाड्या आवळण्यासाठी पाऊले उचलण्यास सुरूवात केली आहे. पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावर एकाकी पाडण्याच्या हालचालीही सुरू आहेत. एवढेच नव्हे तर, भारतीय सुरक्षा दलांनी पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्याचे सूतोवाच केले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)