इराणवरील निर्बंधाने होणारी तेल-तूट सौदी भरून काढणार-ट्रम्पवाणीचा परिणाम ! 

दुबई: अमेरिकेने इराणवर लादलेल्या निर्बंधांमुळे जागतिक तेलपुरवठ्यात येणारी तूट भरून काढण्यास सौदी अरब राजी झाला आहे. सौदीचे युवराज मोहम्मद बिन सलमान यांनी एका मुलाखतीत इराणवरील निर्बंधांमुळे येणारी तूट भरून काढण्याचे आश्‍वासन दिले आहे.
तेलाच्या वाढत्या आंतराष्ट्रीय दरांबाबत अमेरिकेचे अध्यक्ष डोनॉल्ड्‌ ट्रम्प यांनी ओपेकच्या सदस्यांना कडक शब्दांत तंबी दिली होती. सौदीवर दबाव टाकण्याच्या दृष्टीने अमेरिकेच्या लष्करी मदतीविना सौदी चे शाह दोन आठवडेही सत्तेवर राहू शकणार नाहीत, असे ट्रम्प यांनी म्हटले होते. त्यांनी घातलेल्या दबावाच्या परिणामस्वरूप युवराज सलमान यांचे वक्तव्य आल्याचे समजले जात आहे.
इराणच्या तेल निर्यातीवरील अमेरिकेचे निर्बंध 4 नोव्हेंबरपासून लागू होत आहेत. त्यामुळे तेलपुरवठ्यात तूट येऊन तेलाचे दर आकाशाला भिडू नयेत या दृष्टीने अमेरिकेचे प्रयत्न चालू होत आहेत. सध्या असलेला कच्च्या तेलाचा 86 डॉलर्स प्रति बॅरल हा दर गेल्या चार वर्षातील सर्वाधिक दर आहे.
मात्र ही दरवाढ इराणवरील अमेरिकन निर्बंधामुळे नसून कॅनडा , मेक्‍सिको, लीबिया, व्हेनेन्झुएला आदी विविध देशांतील परिस्थिती आहे, असे युवराज सुलेमान यांचे म्हणणे आहे. सध्या सौदी अरब दररोज 1 कोटी 7 लाख बॅरल तेलाचे उत्पादन करत आहे. दररोज आणखी 13 लाख बॅरल्सचे उत्पादन करता येणार आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)