‘खशोगींच्या हत्येला सौदी अरेबियाच जबाबदार’ : हॅटिस सेंगीझ

खशोगींच्या मैत्रिणीचा आरोप 

लंडन – तुर्कस्तानात सौदीच्या दूतावासात हत्या झालेले पत्रकार खशोगी यांची प्रेयसी हॅटिस सेंगीझ यांनीही खशोगी यांच्या हत्येप्रकरणी सौदी अरेबियाला जबाबदार धरले आहे. खशोगी यांच्या हत्येप्रकरणी सौदीने माहिती द्यावी. म्हणजे हत्येमागील खरे सूत्रधार उघड होतील, असेही सेंगीज यांनी म्हटले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सौदी अरेबियाचे युवराज महम्मद बिन सलमान हे आपल्या देशात अमूलाग्र सुधारणा घडवून आणण्याचे चित्र निर्माण करत आहेत. त्यांनी पाश्‍चात्य देशांमध्ये आपली ही प्रतिमा उभी केली आहे. या आभासी प्रतिमेवर पत्रकार खशोगी कडाडून टीका करत होते. त्यामुळेच 2 ऑक्‍टोबर रोजी तुर्कस्तानमधील इस्तंबूल येथील सौदी अरेबियाच्या दुतावासात गेल्यानंतर खशोगी यांच्यावर हल्ला करण्यात आला आणि त्यांची क्रुरपणे हत्या करण्यात आली होती.

खशोगी यांची हत्या कशी केली गेली, हे सौदी अरेबियाला माहिती आहे. यावर आता सौदीनेच खुलासा द्यावा, असे आव्हान सेंगीज यांनी दिले आहे. खशोगी यांच्या मारेकऱ्यांना उजेडात आणून आंतरराष्ट्रीय कायद्याखाली शिक्षा देण्याची जबाबदारी माझ्या देशाची आहे. आपण सौदी अरेबियाचे युवराज मोहम्मद अथवा राजघराण्याशी संपर्क साधलेला नाही. तसेच त्यांनीही खशोगी यांच्या मृत्यूबद्दल श्रद्धांजली वाहिलेली नाही असेही सेंगीझ यांनी म्हटले आहे. पत्रकार खशोगी हे तुर्कस्तानच्या नागरिक असलेल्या सेंगीझ यांच्याशी लग्न करणार होते. त्यासाठी ते काही दस्तावेज मिळवण्यासाठी इस्तंबूल येथील दुतावासात 2 ऑक्‍टोबर रोजी गेले होते. त्यानंतर ते दुतावासातून परत आलेच नाहीत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)