सात्विक-अश्‍विनी जोडीचे आव्हान संपुष्टात 

नानजिंग: अश्‍विनी पोनप्पा आणि सात्विकसाईराज रॅंकिरेड्डी या भारतीय जोडीने गोह सून हुआत आणि शेव्हॉन जेमी लाय या सातव्या मानांकित मलेशियन जोडीवर सनसनाटी विजय मिळविताना मिश्र दुहेरीच्या उपान्त्यपूर्व फेरीत धडक मारली होती. परंतु झेंग सिवेई आणि हुआंग याक्‍विआँग या विश्‍वक्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या आणि या स्पर्धेतील अग्रमानांकित चिनी जोडीने सात्विक-अश्‍विनी जोडीचे आव्हान 21-17, 21-10 असे मोडून काढत उपान्त्य फेरी गाठली.
सात्विक-अश्‍विनी जोडीने राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला मिश्र दुहेरीचे पहिलेवहिले सुवर्णपदक मिळवून दिले होते. दरम्यान बाकी भारतीय जोड्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.

रोहन कपूर व कुहू गर्ग या जोडीला ख्रिस ऍडकॉक व गॅब्रिएली ऍडकॉक या सहाव्या मानांकित ब्रिटिश जोडीविरुद्ध पराभव पत्करावा लागला. सौरभ शर्मा व अनुष्का पारीख या जोडीलाही चॅंग पेंग सून व गोह लियू यिंग या आठव्या मानांकित मलेशियन जोडीने पराभूत केले. तसेच मिश्र दुहेरीत प्रणव चोप्रा व सिक्‍की रेड्डी या अव्वल जोडीला हफीझ फैझल व ग्लोरिया इमॅन्युएल या 12व्या मानांकित इंडोनेशियन जोडीकडून पराभव पत्करावा लागला.

पुरुष दुहेरीत सात्विकसाईराज रॅंकिरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीने किम ऍस्ट्रप आणि अँडर्स रॅस्मुसेन या आठव्या मानांकित ब्रिटिश जोडीविरुद्ध पराभव पत्करला. तर महिला दुहेरीत युकी फुकुशिमा व सायाका हिरोटा या द्वितीय मानांकित जपानी जोडीने अश्‍विनी पोनप्पा व सिक्‍की रेड्डी या भारतीय जोडीला सहज पराभूत केले.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)