जॉन अब्राहम पुन्हा एकदा ‘सत्यमेव जयते’मधून प्रेक्षकांच्या भेटीला

‘परमाणु’ नंतर जॉन अब्राहम पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जॉन देशभक्तीपर चित्रपट ‘सत्यमेव जयते’ घेऊन येत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून ४ लाख पेक्षा जास्त लोकांनी हा ट्रेलर पहिला आहे.

बॉक्स ऑफिसवरील हिट असलेल्या परमाणुप्रमाणेच जॉन पुन्हा ‘सत्यमेव जयते’ या देशभक्तीपर चित्रपटात दिसेल. ज्या चित्रपटात जॉन आहे. त्या चित्रपटात थ्रीलर सीन असतातच. त्यामुळे प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जॉनचा खूप मोठा चाहतावर्ग असून त्यांनी या ट्रेलरला चांगला प्रतिसाद दिला आहे. मिलाप झवेरीने दिग्दर्शित केलेला हा चित्रपट १५ ऑगस्ट रोजी रिलीज होणार आहे.

अक्षय कुमार आणि मोनी रॉयचा ‘गोल्ड’ आणि ‘सत्यमेव जयते’ बॉक्स ऑफिसवर आमने-सामने येणार आहेत. जॉन अब्राहम, मनोज वाजपेयी, आणि आयशा शर्मा हे कलाकार ‘सत्यमेव जयते’ या चित्रपटात दिसणार आहेत.

https://youtu.be/odXKXLG43co

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)