‘सत्यमेव जयते’चा येणार सिक्‍वल? 

बॉलीवूडमधील ऍक्‍शन हिरो जॉन अब्राहम याचा 15 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेला “सत्यमेव जयते’ चित्रपट बॉक्‍स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. या चित्रपटाती टीम चित्रपटाचे दिग्दर्शक मिलाप झवेरी यांच्या बर्थ डेनिमित्त एकत्रित आली होती. “सत्यमेव जयते’ची टीम एकत्रित आल्याने लवकरच या चित्रपटाच्या सिक्‍वलची घोषण होण्याची शक्‍यता आहे.

मिलाप झवेरी यांच्या दिग्दर्शनाखालील “सत्यमेव जयते’ला भूषण कुमार आणि निखिल आडवाणी यांनी प्रोड्यूस केले होते. या चित्रपटातील सर्वोत्कृष्ट संवाद आणि जबरदस्त ऍक्‍शन-थ्रिलरमुळे प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला होता. 90च्या दशकाला अनुरूप या चित्रपटात जॉन अब्राहम आणि आयशा शर्मा यांनी मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटातून आयशाने बॉलीवूडमध्ये यशस्वीपणे पर्दापण केले होते.

“सत्यमेव जयते’च्या प्रदशनानंतरही चित्रपटाचे दिग्दर्शक, निर्माता आणि कलाकार यांच्यातील संर्पक कायम होता. यामुळेच मिलाप झवेरी यांच्या वाढदिनानिमित्त जॉन अब्राहम, भूषण कुमार, निखिल आडवाणी, नोरा फतेहीसह अनेक कलाकार उपस्थित होते. दरम्यान, जॉन अब्राहम सध्या आपल्या आगामी “बाटला हाउस’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट पुढील वर्षी 15 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. यात जॉन एका इनकाउंटर स्पेशलिस्ट पोलीस अधिका-याची भूमिका साकारत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
1 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)