साताऱ्यात महामार्गावरील वेश्‍या व्यवसायाचा पर्दाफाश

लिंब फाट्यावरील धनश्री लॉजवर पोलिसांची कारवाई

सातारा  – पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील सातारा शहरालगत लिंब फाटा परिसरात असलेल्या हॉटेल धनश्री येथे वेश्‍या व्यवसायाचा पोलीसांनी पर्दाफाश केला. या कारवाईत दोन महिलांसह हॉटेल चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

उपविभागीय पोलिस अधिकारी समीर शेख यांच्या पथकाने ही कारवाई केली असून या कारवाईने हॉटेल व्यवसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार हणमंत सावंत यांनी फिर्याद दिली आहे.याबाबत माहिती अशी, सहाय्यक पोलीस अधीक्षक समीर शेख यांना लिंब फाटा परिसरात धनश्री हॉटेलमध्ये वेश्‍या व्यवसाय सुरु असल्याची माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी एक पथक तयार करुन हॉटेलवर छापा टाकला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान पोलीसांना पाहताच हॉटेलमधील संशयितांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र संशयितांना पोलीसांनी तात्काळ ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या हॉटेल चालकाचे नाव शशिकांत येल्लाप्पा देसाई (रा. खेड, ता. सातारा) असे नाव आहे. छाप्याच्या ठिकाणी दोन महिला, एक पुरुष व दुचाकीसह, मोबाईल पोलीसांनी ताब्यात घेतला. पुढील तपास सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीपकुमार जाधव करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)