संतोष पोळची सुनावणी 27 मार्चला होणार !

ज्योतीसह कारागृह पोलीसांवर आरोप; कारागृहातूनच आणली प्रेसनोट

सातारा: धोम ता वाई परिसरात सहा खून करून अखंड महाराष्ट्राला हादरवणार्‍या क्रूरकर्मा संतोष पोळची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. आज (गुरुवारी) होणारी सुनावणी दि. 27 रोजी होणार आहे.

-Ads-

क्रूरकर्मा संतोष पोळच्या कृत्याने अखंड महाराष्ट्र सुन्न झाला होता. कारागृहात गेल्यानंतर सुधारेल असे वाटणार्‍या पोळच्या भानगडी कारागृहातही सुरु असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. हत्याकांडानंतर पोलिसांच्या अटकेत असलेल्या पोळने तत्कालीन जिल्हा पोलीस प्रमुखांना पत्र लिहून अटक केल्याबद्दल अभिनंदन केले होते. त्यानंतर कळंबा कारागृहातही त्याने पिस्तुलासह स्वतःचा व्हिडिओ बनवून पुन्हा एकदा महाराष्ट्रात खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर पुणे येथील येरवडा कारागृहात असलेल्या पोळने खुन खटल्याचे तपासी अधिकारी, माफीचा साक्षीदार ज्योती मांढरेसह सातारा कारागृहातील एका अधिकार्‍यावर आरोप करणारी प्रेस नोट तयार केली आहे. पोळ हा समाजाचे व यंत्रणांचे लक्ष स्वत:कडे वेधून घेण्यासाठी अथवा विचलित करण्यासाठीच असे प्रकार करत असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान पोळने माध्यमांना देण्यासाठी कारागृहातून प्रेसनोट आणल्याने येरवडा कारागृह प्रशासनाच्या कामगिरीवरच प्रश्नचिन्ह उभे केले जात आहे.

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)